केस गळणं ही सध्याची सर्वसामान्य समस्या झालेली आहे.
केसगळतीसाठी मेथी चांगला उपाय आहे. त्यामुळे केस गळणं, तुटणं थांबतात.
मेथीचे दाणे दाह-विरोधी, अँटी-ऑक्सिडंट असतात, केस वाढण्यास मदत होते.
मेथीत हा पदार्थ मिसळून लावा केस जाड होतील, केसगळती कमी होईल.
कलौंजीमध्ये अमिनो अॅसिड असते, त्यामुळे केस गळणे थांबते.
मेथी, कलौंजी आणि 4 लवंगा घेऊन तळून घ्या. नंतर या गोष्टी मिक्सरमध्ये नीट वाटून घ्या.
पाणी कोमट करून त्यात ही पावडर टाका आणि मिक्स करा.
या मिश्रणात आता खोबरेल तेल मिक्स करा आणि बाटलीत भरून ठेवून द्या.
हे सीरम केसांच्या मुळापर्यंत लावा. या सीरममुळे केस गळणं थांबेल.
मात्र, हे सीरम लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा.