स्त्रीच्या शरीराचा केंद्रबिंदू असतो गर्भाशय
याच गर्भाशयाशी संबंधित काही समस्या जाणून घेऊया.
गर्भाशयात फायब्रॉइड्स वाढू शकतात, या गाठी कॅन्सरच्या नसतात.
ओटीपोटात दुखणं किंवा कळ येणे या समस्या उद्भवू शकतात.
मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव, इंटरकोर्सनंतर रक्तस्त्राव, म्हणजे यूटरिन ब्लीडिंगची समस्या असू शकते.
तणाव,हार्मोनल असंतुलन,थायरॉइड यामुळेही यूटरिन ब्लीडिंग होऊ शकते.
एंडोमेट्रियम अंडाशयाच्या वर किंवा खाली,फॅलोपियन ट्यूबवर तयार झाल्यास त्याला एंडोमेट्रिओसिस म्हणतात.
या दरम्यान ओटीपोटात दुखणं, थकवा जाणवतो किंवा स्पॉटिंगसुद्धा होऊ शकते.
गर्भाशयाशी संबंधित या समस्या आढळल्यास डॉक्टांरांचा त्वरित सल्ला घ्या