औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या हिंगामध्ये अनेक पोषक तत्वे आढळतात.

सकाळी कोमट पाण्यात चिमूटभर हिंग टाका, काळं मीठ घाला आणि प्या.

अर्धा ग्लास पाण्यात हिंग टाकून प्यायल्यास गॅस, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

हिंगामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-व्हायरल गुणधर्म आढळतात. खोकला, सर्दीचा त्रास कमी होतो.

रात्री झोपण्यापूर्वी हिंगाच्या पाण्याचे सेवन केल्याने कृमी आणि दातदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो.

हिंगाच्या पाण्यामुळे पोटदुखी, मासिक पाळीचं दुखणं कमी होतं.

हिंगाची पेस्ट नाभीमध्ये लावल्यानेही आराम मिळतो.

वजन कमी करण्यासाठीही हिंगाचं पाणी पिणं फायदेशीर ठरते.