हेल्दी आणि फिट राहण्यासाठी योगासनं करणं फायदेशीर मानलं जातं.

नियमितपणे योगासनं केल्यास आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.

मात्र काही छोट्या छोट्या चुकांमुळे फायद्याऐवजी नुकसानच होतं.

आसनं करताना मुद्दाम ओढूनताणून करू नयेत.

योगासनं करताना एकदम फिट कपडे घालू नये, त्यामुळे हालचाल करण्यात अडचण येते.

योगा करताना कोणताही विचार मनात आणू नये, त्यामुळे ध्यान भरकटते.

ब्रेकफास्ट, जेवणानंतर योगासनं करण्याची चूक करू नये.

योगासने करताना शरीरासह मनावरही नियंत्रण ठेवा.

कोणताही आजार असल्यास योग प्रशिक्षकाचं मार्गदर्शन नक्की घ्या.