पपई कच्ची असो वा पिकलेली ती शरीरासाठी फायदेशीरच आहे.
जाणून घेऊया कच्ची पपई खाण्याचे काय आहेत फायदे.
कच्च्या पपईमध्ये व्हिटामिन सी,ए, मॅग्नेशिअम, खनिजं आहेत.
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, संक्रमणाचा धोका कमी होतो.
कच्च्या पपईमध्ये एंजाइम असते जे पचनास मदत करते. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
कॅलरी कमी आणि फायबर मोठ्या प्रमाणात कच्चा पपईमध्ये असते. त्यामुळे मेटाबॉलिझम रेट वाढते.
त्वचेचे आरोग्य सुधारण्यास, वृद्धत्वाची लक्षणे कमी करते, रॅडिकल्समुळे होणारे त्वचेचे नुकसान टाळण्यास मदत करू शकते.
दृष्टी चांगली राखण्यासाठी कच्ची पपई एक उत्तम उपाय आहे.