दिवसाची सुरूवात अनेकजण चहाने करतात.

दिवसभर काम करून थकल्यानंतर चहाने कामाचा क्षीण नाहीसा होतो.

मात्र, याच चहात एक चमचा तूप टाकून प्यायल्यास खूप फायदे होतात.

तूप टाकून चहा प्यायल्याने आळस दूर होतो, भरपूर एनर्जी मिळते.

तूप हृदयासाठी फायदेशीर आहे, त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.

इम्युनिटी वाढवण्यासाठीही चहात तूप टाकून पिणे फायदेशीर आहे.

मेंदूचं कार्य सुधारण्यासाठी चहात तूप टाकून पिऊ शकता.

चहात तूप घातल्यास स्ट्रेस रिलीज व्हायला मदत होते असंही म्हटलं जातं.

त्यामुळे चहा पिताना त्यात 1 चमचा तूप टाकून प्या.