शरीर निरोगी ठेवण्यासाठी योगासने करणं फायदेशीर ठरते.
पपी योग करण्यासाठी वज्रासनात बसावे. दोन्ही हात वर करा आणि पुढे झुका. हात जमिनीवर ठेवून शरीर वर उचला.
ऑफिसमध्ये अनेक तास बसल्याने कंबरेला वेदना होतात. पाठदुखी दूर करण्यासाठी तुम्ही पपी योगाचा सराव करू शकता.
पपी पोझचा सराव स्नायूंसाठी फायदेशीर आहे. सराव केल्याने स्नायू ताणले जातात.
या योगामुळे रक्ताभिसरण सुधारते. नियमित सरावाने शरीरालाही आराम मिळतो.
शरीरात लवचिकता येते. कंबर,पाठ आणि पायदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते.
या योगासनामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. बद्धकोष्ठता, अपचन, गॅसच्या समस्या दूर होतात.
या योगामुळे शरीराला अनेक फायदे होतात.