डायबिटीजच्या रुग्णांनी भात खावा, मात्र त्याचं प्रमाण किती असावं जाणून घ्या.
ब्राउन राइस, लाल तांदूळ, कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि काळा तांदूळ हे चांगले पर्याय आहेत.
डाळी, भाज्या आणि प्रथिने युक्त आहारासोबत भात खा म्हणजे रक्तातील साखरेची पातळी वाढणार नाही.
एकावेळी भात कमी प्रमाणात खा. त्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
रात्री ऐवजी सकाळी किंवा दुपारच्या जेवणात भात खाणे जास्त फायदेशीर आहे.
भात जास्त शिजवू नका. जास्त शिजवलेला भात लवकर पचतो, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते.
नियमित व्यायामामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासत राहा.