उन्हात घराबाहेर पडताना शरीराची काळजी घेणं गरजेचं आहे.
फोटो सौजन्य - ANI News
डिहायड्रेशनमुळे थकवा,गॅस, उलट्यांचा त्रास होतो.
अशावेळी हीट स्ट्रोकपासून बचाव करण्यासाठी डाएटमध्ये लिंबाचा समावेश करा.
लिंबापासून तयार होणाऱ्या या 4 समर स्पेशल ड्रिंक्सबद्दल जाणून घ्या.
दुधाच्या चहाऐवजी lemon ice tea हा एक उत्तम पर्याय आहे.
त्यासाठी एका पातेल्यात पाणी घ्या, उकळ्यावर टी बॅग टाका, 5 मिनिटं उकळवा. नंतर त्यात लिंबाचा रस, साखर घाला. फ्रीजमध्ये थंड करा.
लिंबू,कलिंगडापासून रिफ्रेशिंग कूलर तयार करू शकता.
कलिंगडाचा ज्यूस काढून तो गाळून घ्या. त्यात लिंबाचा रस, साखर आणि बर्फ घालून थंड करा.
मिंट लेमोनेड अर्थातच लिंबू आणि पुदिन्याचं समर स्पेशल ड्रिंक.
एका ग्लासमध्ये लिंबाचा रस घ्या आणि नंतर पुदिन्याच्या पानांचा रस घाला किंवा कुस्करून घ्या.
यानंतर त्यात काळे मीठ, सोडा आणि साखर घाला. मिंट लेमोनेड पिण्यासाठी तयार..