उन्हाळ्यात नेहमीपेक्षा पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे.
उन्हाळ्यात खूप घाम येतो. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते.
शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे डिहायड्रेशन होण्याचा धोका असतो.
त्यामुळे उन्हाळ्यात 3 ते 4 लीटर पाणी प्यावे असं म्हटलं जातं.
पाणी कमी प्यायल्यास चक्कर, थकवा जाणवतो.
तसेच पाणी कमी प्यायल्याने किडनी स्टोनचा त्रासही होऊ शकतो.
बाहेर पडताना पाण्याची बॉटल नेहमी स्वत: सोबत ठेवावी.
रसाळं फळ, नारळ पाणीही उन्हाळ्यात जरूर प्यावे.