सध्याच्या काळात हृदय विकाराच्या झटक्याने
जीव जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
फिट आणि हेल्दी दिसणाऱ्यांनाही हार्ट अटॅक
येत असल्याचं दिसत आहे.
हार्ट अटॅक येण्याची अनेक कारणे आहेत त्यापैकी
एक म्हणजे स्मोकिंग.
जास्त प्रमाणात तणाव आणि काळजीही
हार्ट अटॅक येण्याचं कारण असू शकतं.
पुरेशी झोप न होणं यामुळेही हार्ट अटॅक येऊ शकतो.
7 ते 8 तास झोप घेणं शरीरासाठी आवश्यक आहे.
जास्त प्रमाणात फास्ट फूडचं सेवनही हार्ट अटॅकचं कारण ठरू शकतं.
अनुवंशिकताही काही प्रमाणात हार्ट अटॅक येण्याचं कारण असू शकतं.
अतिप्रमाणात व्यायाम केल्यास हार्ट अटॅक येण्याचा धोका असतो.
मधुमेह, हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉलमुळेही हार्ट अटॅक येण्याची शक्यता नाकारता येत नाही.