पुरामुळे नागपूरकरांचे हाल
नागपुरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
ढगफुटीसदृश्य पाऊस पडल्याने नागनदीला पूर आला आहे.
अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने आजुबाजूच्या भागात पाणी साठलं आहे.
पुराचं पाणी शिरल्यामुळे नागपुरात अनेक घरांचं नुकसान झालं आहे.
पुरामुळे नागपुरात शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.
गरज नसेल त्यांनी घराबाहेर पडू नका, असं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम नागपुरात दाखल झाली आहे.
नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरु आहे.