करण देओलच्या लग्नाला हेमा मालिनी जाणार नाही, जाणून घ्या सविस्तर

करणच्या लग्नाला  हेमा मालिनी येणार का?

सध्या बॉलिवूडमध्ये सनी देओलचा मुलगा करणच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. बी-टाऊनचे प्रसिद्ध सेलिब्रिटी या लग्नाला हजेरी लावणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, जनतेच्या मनात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तो असा आहे की, हेमा मालिनी पती धर्मेंद्रच्या पहिल्या फॅमिली फंक्शनला हजर राहणार?

टाइम्स ऑफ इंडियाने आपल्या वृत्तात हेमा मालिनी करण देओलच्या लग्नाला उपस्थित राहणार नसल्याचे वृत्त दिले आहे. याचे कारणही देण्यात आले आहे.

कुटुंबातील जवळच्या सूत्रानुसार, हेमाजींनी धरमजींच्या पहिल्या कुटुंबियांपासून नेहमीच अंतर ठेवले आहे. त्यामुळे त्या करणच्या लग्नाला जाणार नाही. असा प्रश्न विचारणेही चुकीचे आहे.

सूत्रांनी असेही सांगितले की, हेमा मालिनी यांच्या मुली ईशा आणि अहाना देओल त्यांच्या पतीसह लग्नाला उपस्थित राहणार आहेत.

मोठा भाऊ म्हणून सनीने ईशा आणि आहानाला करणच्या लग्नासाठी आमंत्रित केले आहे. त्यामुळेच त्या काही काळ लग्नाला उपस्थित राहू शकतात.

करण देओलच्या संगीत कार्यक्रमात ईशाही हजेरी लावणार असल्याची चर्चा आहे. ती खास डान्स परफॉर्मन्स देणार आहे. करण-द्रिशाच्या लग्नासाठी ती उत्सुक आहे.

ईशा आणि आहानाच्या लग्नाला सनी आणि बॉबीने हजेरी लावली नव्हती हे तुम्हाला माहिती आहे. धर्मेंद्र यांनी 1980 मध्ये हेमासोबत दुसरे लग्न केले. दोन्ही पत्नींचे कुटुंबीय एकमेकांपासून अंतर ठेवून आहेत.