Hero MotoCorp ने नवीन Xtreme 200S 4V लाँच केली आहे.

याची एक्स शोरुम किंमत 1,41,250 रुपये आहे. 

 ही बाईक ड्युअल-टोन शेड्ससह मून यलो, पँथर ब्लॅक मेटॅलिक आणि प्रीमियम स्टेल्थ  अशा रंगांमध्ये सादर करण्यात आली आहे.

कंपनीने या बाईकमध्ये नवीन 4-व्हॉल्व्ह इंजिन दिले आहे, जे आधीच्या इंजिनपेक्षा 6 पट जास्त पॉवर आणि 5 पट जास्त टॉर्क जनरेट करते.

बाईकमध्ये 199.6 सीसी, सिंगल-सिलेंडर, ऑईल-कूल्ड, फ्युएल-इंजेक्टेड, फोर-स्ट्रोक, 4-व्हॉल्व्ह इंजिन आहे. 

 हे इंजिन 8,000 RPM वर 18.9 bhp ची पॉवर आणि 6,500 RPM वर 17.35 Nm ची सर्वोच्च टॉर्क जनरेट करते.

 यात 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे.

 पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस मोनो-शॉक  absorber आहेत. यासोबतच सिंगल चॅनल ABS सह दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक आहेत.

यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन,डिजिटल LCD मीटर आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर ही वैशिष्ट्ये आहेत.