Hero MotoCorp ने त्यांच्या Xtreme 160R 4V या बाइकचे नवीन अपडेटेड मॉडेल लाँच केले आहे.
नव्या बाइकमध्ये अनेक नवीन फिचर्स, आणि नवं तंत्रज्ञान आहे त्यामुळे मॉडेल चांगले दिसते.
Xtreme 160R चे स्टॅण्डर्ड मॉडेलसह कनेक्टेड 2.0 आणि प्रो व्हेरिएंट मॉडेल असे 3 प्रकार आहेत.
Xtreme 160R च्या या 3 मॉडेल्सची किंमत 1,27300 (स्टण्डर्ड), 1,32800 (कनेक्टेड 2.0) आणि 1, 36500 (प्रो वेरिएंट) ची किंमत आहे.
या बाइकमध्ये 163cc क्षमतेचे 4 वाल्व्ह एअर-ऑइल कूल्ड BS-VI इंजिन दिले आहे जे 16.9 Ps पॉवर आणि 14.6Nm टॉर्क जनरेट करते.
कंपनीचा दावा आहे की ही या सेगमेंटमधील सर्वात वेगवान बाईक आहे.
स्टॅण्डर्ड मॉडेलचे वजन 144 किलो आणि प्रो मॉडेलचे वजन 145 किलो आहे. यात 12 लीटर क्षमतेची इंधन टाकी आहे.
Hero Xtreme 160R 4V ला कॉल आणि नोटिफिकेशन अलर्टसह ब्लूटूथ-सक्षम LED डिस्प्ले आहे.
स्टॅण्डर्ड मॉडेल- टेलिस्कोपिक फोर्क्स, सिंगल सीट
कनेक्टेड व्हेरिएंट- ब्लूटूथ
प्रो व्हेरिएंट - USD फोर्क,स्प्लिट-सीट सेटअप, ड्युअल-टोन कलर
बुकिंग सुरू झालं असून जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात बाइकची डिलीव्हरी केली जाईल असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.