Hero Splendorचा जबरदस्त नवा अवतार!

Automobile

14 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

भारतातील लोकप्रिय कम्युटर बाइक आता आणखी रफ-टफ अंदाजात दिसण्याची शक्यता आहे. Hero MotoCorp ने Splendor आधारित नवीन डिझाइनचे पेटंट दाखल केले आहे.

Hero Splendorचा जबरदस्त नवा अवतार!

Picture Credit: pinterest

पेटंटमधील एका बाइकचा लूक नेहमीच्या Splendorपेक्षा पूर्णपणे वेगळा दिसतो. यात ऑफ-रोड बाइक्ससारखे डिझाइन एलिमेंट्स देण्यात आले आहेत.

Splendorला मिळणार Off-Road लूक?

Picture Credit: pinterest

या पेटंटेड मॉडेलमध्ये पुढील भागात उंचावलेला फ्रंट फेंडर आणि वेगळ्या प्रकारचा 'Beak' डिझाइन दिसते. त्यामुळे बाइकला Adventure Bikeसारखा लूक मिळतो.

समोर दिसतोय खास Beak Design

Picture Credit: pinterest

बाईकच्या हँडलबारवर Knuckle Guards देण्यात आले आहेत. ऑफ-रोड राइडिंगदरम्यान हातांचे संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारचा सेटअप उपयुक्त ठरतो.

Knuckle Guardsचीही झलक

Picture Credit: pinterest

पेटंटमधील बाइकला लाँग-ट्रॅव्हल सस्पेंशन सेटअप असल्याचे दिसते. पुढे Telescopic Fork आणि मागे Dual Shock Absorbers असल्याचे रिपोर्टमध्ये नमूद आहे.

Suspensionमध्येही मोठा बदल

Picture Credit: pinterest

फ्रंट फोर्कवर Rubber Gaiters देण्यात आले आहेत. यामुळे बाइकचा ऑफ-रोड लूक आणखी उठून दिसतो आणि डिझाइनला रग्ड टच मिळतो.

Rubber Gaitersमुळे रफ लूक

Picture Credit: pinterest

Hero ने फक्त एका मॉडेलचे नव्हे तर दोन Splendor-आधारित डिझाइनचे पेटंट दाखल केले आहेत. दुसऱ्या मॉडेलचा लूक तुलनेने पारंपरिक आहे आणि त्यात Beak व Knuckle Guards दिसत नाहीत.

दुसरेही Splendor-based डिझाईन पेटंट

Picture Credit: pinterest

पेटंटमध्ये इंजिनची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र रिपोर्टनुसार ही बाइक सध्याच्या 97.2cc, सिंगल-सिलिंडर इंजिनवर आधारित असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इंजिन कोणते मिळणार?

Picture Credit: pinterest

सध्या Hero MotoCorpने या मॉडेलच्या लॉन्चबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे पेटंट दाखल झाले असले तरी बाइक प्रत्यक्षात बाजारात येईलच, असे निश्चितपणे म्हणता येत नाही.

Launch होणार की फक्त Patentच राहणार?

Picture Credit: pinterest

जर हा ऑफ-रोड स्टाइलचा Splendor उत्पादनात आला, तर Heroच्या लोकप्रिय कम्युटर बाइकला एकदम नवा अवतार मिळू शकतो. आता Hero याबाबत काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Splendor प्रेमींसाठी मोठी गोष्ट

Picture Credit: pinterest