Hero ची छोटी कार भारतात येणार? Vida Nex 3 चे पेटंट दाखल!

Automobile

11 Nov 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Hero MotoCorp ची Vida Nex 3 ही मायक्रो कार पुन्हा चर्चेत आली आहे. कंपनीने या कारचे भारतात पेटंट दाखल केले आहे.

Hero Vida Nex 3 चर्चेत!

Picture Credit:vidaworld

नोव्हेंबर 2025 मध्ये Hero Vida Nex 3 ही कार कॉन्सेप्ट स्वरूपात सादर करण्यात आली होती. आता पेटंटमुळे तिची चर्चा सुरू झाली आहे.

पहिल्यांदा कधी दिसली?

Picture Credit:vidaworld

ही कार आकाराने छोटी आणि कॉम्पॅक्ट असणार आहे. शहरातील गर्दीच्या रस्त्यांवर सहज प्रवास करता यावा, हा यामागचा उद्देश आहे.

कारचे खास डिझाइन

Picture Credit:vidaworld

Hero Vida Nex 3 मध्ये दोन जणांना बसण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे ही कार प्रामुख्याने शहरी प्रवासासाठी उपयुक्त ठरू शकते.

दोन जणांसाठी खास!

Picture Credit:vidaworld

या कारमध्ये विंग-टाइप डोअर देण्यात आले आहे. हे या पेटंटमधील सर्वात लक्षवेधी वैशिष्ट्य आहे.

Wing-Type Door ची खासियत

Picture Credit:vidaworld

कॉन्सेप्टमध्ये आयताकृती किंवा गोलाकार सेंटर स्क्रीनचे पर्याय दाखवण्यात आले आहेत. यामुळे कारच्या इंटिरिअरला वेगळा लूक मिळतो.

दोन प्रकारचे सेंटर स्क्रीन

Picture Credit:vidaworld

मुंबईसारख्या गर्दीच्या शहरांमध्ये मोठ्या कार चालवणे अनेकदा कठीण होते. अशा वेळी छोटी मायक्रो कार प्रवासासाठी पर्याय ठरू शकते.

शहरातील प्रवासासाठी पर्याय

Picture Credit:vidaworld

Hero MotoCorp आतापर्यंत दुचाकींसाठी ओळखली जाते. Vida Nex 3 च्या माध्यमातून कंपनी फोर-व्हीलर क्षेत्रात पाऊल ठेवण्याची शक्यता चर्चेत आहे.

Hero ची फोर-व्हीलर क्षेत्रात एन्ट्री?

Picture Credit:vidaworld

सध्या कंपनीने लॉन्चबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. तसेच कारचे तांत्रिक तपशीलही अद्याप समोर आलेले नाहीत.

लॉन्च कधी होणार?

Picture Credit:vidaworld

भारतात पेटंट दाखल झाले असले तरी Vida Nex 3 प्रत्यक्ष बाजारात येणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आता Hero च्या अधिकृत घोषणेकडे लक्ष लागले आहे.

पेटंट म्हणजे लॉन्चची खात्री नाही!

Picture Credit:vidaworld