हिल्सा म्हणजेच टेनुआलोसा इलिशा भारत, बांगलादेश, पाकिस्तान आणि बर्मासह जगभरातील 11 देशांमध्ये आढळते.
भारतात महानदी, चिल्का, गोदावरी, रुपनारायण, हुगळी, आणि नर्मदा नदीमध्ये सापडते.
हिल्सा बांगलादेशचा राष्ट्रीय मासा देखील आहे, या फिशचे उत्पादन देशाच्या एकूण जीडीपीमध्येही योगदान आहे
ही फिश खाल्ल्याने हृदयविकार, पक्षाघात, कर्करोग, नैराश्य या आजारांचा धोका कमी होतो.
यासोबतच मेंदूचा विकासही व्यवस्थित होतो आणि रक्तदाबही कमी होतो.
भारतीय बाजारपेठेत हिल्सा फिशची किंमत 1200 रुपये ते 2000 रुपये प्रति किलो आहे.
2018 मध्ये, पश्चिम बंगाल सरकारने भारतातील हिल्साचे उत्पादन सतत घसरत असताना लहान हिल्सा मासे पकडण्यावर बंदी घातली होती
हिल्सा मासळीचे संगोपन करून चांगला नफा मिळवता येऊ शकतो.