Royal Enfieldच्या या दोन्ही बाइक्समध्ये अनेक समानता आहेत; पण डिझाइन, वापर आणि फीचर्सच्या बाबतीत काही महत्त्वाचे फरक आहेत.
Picture Credit : royalenfield
Himalayan 440 ची एक्स-शोरूम किंमत ₹2.29 लाख आहे. दुसरीकडे, Scram 440 ची सुरुवातीची किंमत ₹2.24 लाख आहे. म्हणजे दोन्हींमध्ये केवळ ₹5 हजारांचा फरक पडतो.
Picture Credit : royalenfield
Himalayan 440 आणि Scram 440 या दोन्ही मॉडेल्समध्ये 443cc सिंगल-सिलिंडर, एअर-कूल्ड इंजिन वापरण्यात आले आहे.
Picture Credit : royalenfield
दोन्ही बाइक्सचे इंजिन 25.42 PS कमाल पॉवर आणि 34 Nm टॉर्क तयार करते. त्यामुळे कागदावर पाहिल्यास दोन्हींची इंजिन कामगिरी जवळपास समान आहे.
Picture Credit : royalenfield
Himalayan 440चे डिझाइन Adventure Touring लक्षात घेऊन करण्यात आले आहे. Scram 440 मात्र Scrambler शैलीतील बाइक असून ती शहरातील वापरासोबत हलक्या Touringसाठीही योग्य पर्याय ठरते.
Picture Credit : royalenfield
Himalayan 440 मध्ये Analogue-Digital कन्सोल, LED लाइट्स आणि नेव्हिगेशनसारखी फीचर्स आहेत; Scram 440 मध्ये Bluetooth कनेक्टिव्हिटी मिळते.
Picture Credit : royalenfield
लांब प्रवासासाठी दोन्ही बाइक्समध्ये 15-लिटरची टाकी देण्यात आली आहे.
Picture Credit : royalenfield
ऑफ-रोड आणि Adventure Touringसाठी Himalayan 440 अधिक योग्य; शहर + Touringसाठी Scram 440 हा आकर्षक पर्याय ठरू शकतो.
Picture Credit : royalenfield
किंमतीत मोठा फरक नाही आणि इंजिनही समान आहे. त्यामुळे Adventure लूक व लांब प्रवासासाठी Himalayan 440, तर City + Touringसाठी Scram 440 निवडणे अधिक योग्य ठरू शकते.
Picture Credit : royalenfield