हिंदू धर्मात ताजे गोमूत्र अत्यंत पवित्र मानले जाते
अनेक आजारांवर उपाय म्हणून गोमूत्र प्यायला दिले जाते
नुकत्याच झालेल्या संशोधनात गोमूत्रात धोकादायक जीवाणू असतात, अशी माहिती समोर आलेली आहे.
उत्तर प्रदेशातील बरेलीस्थित (आयव्हीआरआय) या देशातील प्रमुख पशुवैद्यकीय संशोधन संस्थेने केलेल्या संशोधनात गोमूत्रात आढळले धोकादायक किटाणू
निरोगी गायी आणि बैलांमध्ये Escherichia coli सह कमीतकमी 14 प्रकारचे हानिकारक किटाणू असतात. यामुळे पोटात संसर्ग होऊ शकतो.
म्हशीच्या मूत्रातील किटाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गायींच्या लघवीपेक्षा कितीतरी पटीने चांगला असल्याचं समोर आलं आहे.
साहिवाल, थारपारकर आणि विंदावणी (क्रॉस ब्रीड) या तीन प्रकारच्या गायींच्या लघवीच्या गोळा केलेल्या नमून्यातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.