वास्तूनुसार मुख्य दरवाजातून भाग्य आणि लक्ष्मी प्रवेश करतात असं मानलं जातं.
मुख्य दाराबाहेर पायपुसणे ठेवल्यास घराचं सौंदर्य टिकून राहतं तसेच घरामध्ये धूळ जात नाही.
घरात पायपुसणे ठेवल्याने सुख-समृद्धी टिकून राहते. ते योग्य दिशेने ठेवणे शुभ मानले जाते.
घरात ठेवलेल्या पायपुसण्याचा रंग घराच्या दिशेवर अवलंबून असतो.
पूर्वेला पायपुसणं ठेवायचे असल्यास प्रवेशद्वाराबाहेर पांढऱ्या, पिवळ्या किंवा क्रीम रंगाचे असावे
पश्चिम दिशा ही शनीची दिशा मानली जाते. या दिशेला मुख्य दरवाजा असल्यास निळ्या,पांढऱ्या किंवा हिरव्या रंगाचं पायपुसणं ठेवावे
उत्तर दिशेला हिरव्या, पांढऱ्या, पिवळ्या किंवा क्रीम रंगाचे पायपुसणे ठेवावे. ही दिशा बुधाची दिशा मानली जाते.
दक्षिण ही मंगळाची दिशा आहे. या दिशेला पांढऱ्या किंवा हिरव्या रंगाचं पायपुसणं ठेवावे.