पाठदुखीची समस्या आजकाल अनेकांना जाणवत असते.

ऑफिसमध्ये अनेक तास काम केल्यामुळे आणि एका ठराविक पद्धतीत बसल्यामुळे पाठदुखी वाढते. 

पाठदुखी टाळण्यासाठी काही उपाय आहेत. ते उपाय आपण जाणून घेऊयात.

चालताना किंवा बसताना, पाठ सरळ ठेवा, यामुळे तुमचा पाठीचा कणा ताठ राहतो. वाकून बसल्याने पाठदुखीची समस्या निर्माण होत असते.

काही वेळ काम केल्यानंतर ब्रेक घेऊन फेरी मारा आणि पुन्हा कामाला सुरुवात करा.

शरीर तंदुरुस्त ठे‌वण्यासाठी व्यायाम करणं आवश्यक आहे पण पाठदुखीची समस्या असलेल्यांनी पाठदुखी वाढवणारे व्यायाम करणं टाळावं.

जड वस्तू उचलणं टाळा. जर जड वस्तू उचलायची असेल तर गुडघे वाकवून मग ती वस्तू उचला म्हणजे कंबरेवर भार येणार नाही.

जड वस्तू उचलण्यासाठी तुम्ही इतरांची मदत घेऊ शकता.

पाठदुखी मुळापासून नष्ट करण्यासाठी आहारात व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फॉस्फरस, हिरव्या भाज्या यांचा समावेश करा. मासे खाल्ल्यानेही हाडे मजबूत होतात.