गुडघेदुखीवर करा ‘हे’ घरगुती उपाय
गुडघेदुखीची वेगवेगळी कारणं असली तरी युरिक ॲसिड वाढल्यामुळे अनेकदा गुडघेदुखी वाढते.
शरीरातील वाढलेले युरिक ॲसिड कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतील असे 5 घरगुती उपाय आपण जाणून घेणार आहोत.
त्रिफळा सेवनाने सांधेदुखीपासून आराम मिळतो. त्रिफळामध्ये बहेडा/बेहडा,आवळा आणि हरड/हिरडा या तीन प्रकारच्या औषधी वनस्पती असतात.
त्रिफळा हे दाहक विरोधी आहे. सांध्यातील सूज आणि वेदना कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे.
कारल्यामुळे वातदोष कमी होतो.आयुर्वेदानुसार सांधेदुखीवर मात करण्यासाठी कारल्याचं सेवन करावं. कारल्यामुळे शरीरातील यूरिक ॲसिड कमी होते.
कोरफडीमध्ये अँटी इन्फ्लामेंटरी गुणधर्म आहेत.कोरफडीचा रस रक्तातील यूरिक ॲसिडचं प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करतो.यामुळे सांधेदुखी कमी होते.
हळदीमधील कर्क्यूमिन रक्तातील यूरिक ॲसिड काढून टाकते.
हळद सांधेदुखी किंवा संधिवाताची लक्षणं कमी करते. दुधात मिसळून प्यायल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो.
कडुलिंबाची पानं कुस्करून दुखणाऱ्या सांध्यांवर लावल्यास वेदनेवर लवकर आराम मिळतो. कडुलिंब सांध्यातील जळजळ आणि वेदना दूर करते.