उचकी थांबवण्यासाठी रामबाण उपाय
उचकी लागल्यावर काय करावं हे आपल्याला सुचत नाही. पण उचकी लागल्यावर उपयोगी ठरतील, असे काही उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
दिर्घ श्वास घ्या. काही सेकंद श्वास रोखून ठेवा आणि सोडा. उचकी थांबेल.
उचकी आल्यावर लगेच एक चमचा साखर खा. यामुळे थोड्या वेळात उचकी थांबेल.
उचकी आल्यावर एक चमचा लिंबाचा ताजा रस घ्या त्यात एक चमचा मध टाकून मिक्स करा. हे चाटण घेतल्यावर उचकी बंद होईल.
अनेक वेळा जास्त वेगाने खाल्ल्याने उचकी लागते. जेवताना हळूहळू आणि चावून जेवा, असे केल्यास उचकी थांबते. फास्ट खाल्ल्याने किंवा तिखट खाल्याने उचकी लागते.
मिठाच्या पाण्याने गुळण्या करा म्हणजे उचकी थांबेल.
उचकी लागली तर एक चमचा चॉकलेट पावडर खा. ती खाल्ल्याने थोड्या वेळात उचकी बंद होते.
काळी मिरी, टोमॅटो किंवा पिनट बटर खाल्ल्यानेदेखील उचकी थांबते.