Robot Vacuum घराचा Map कसा बनवतो? जाणून घ्या Mapping Technology

Science Technology

05 Oct 2026

Author: प्रज्ञा घोगळे - निकम

Robot Vacuum घरात फिरताना फक्त धूळ साफ करत नाही, तर आजूबाजूच्या जागेची माहिती घेऊन Map तयार करू शकतो.

घराचा Map कसा तयार होतो?

Picture Credit: Pinterest

Robot Vacuumमध्ये विविध Sensors असतात. त्यांच्या मदतीने Robotला भिंती, फर्निचर आणि घरातील अडथळ्यांची माहिती मिळते.

यासाठी Sensors असतात!

Picture Credit: Pinterest

काही Advanced Robot Vacuumमध्ये LiDAR Sensor असतो. तो Laserच्या मदतीने आजूबाजूच्या वस्तूंचं अंतर मोजतो.

LiDAR Technology

Picture Credit: Pinterest

LiDAR Sensor आसपासच्या वस्तूंवर प्रकाशाचे संकेत पाठवतो. ते परत येण्याच्या वेळेवरून Robotला वस्तू किती दूर आहे याचा अंदाज येतो.

Laserमधून Distance मोजलं जातं

Picture Credit: Pinterest

Robotच्या हालचालींची माहिती Sensors आणि Software सतत तपासत असतात. त्यामुळे तो कुठे गेला आणि कुठे जायचं बाकी आहे, याचा अंदाज घेऊ शकतो.

Robotला दिशा कशी कळते?

Picture Credit: Pinterest

सर्व Robot Vacuumमध्ये LiDAR असतोच असं नाही. काही Models Camera, Infrared Sensors, Gyroscope किंवा इतर Navigation Technology वापरतात.

फक्त LiDARच नाही!

Picture Credit: Pinterest

Robot पहिल्यांदा घरात फिरताना वेगवेगळ्या भागांची माहिती जमा करतो. ही माहिती Software एकत्र करून घराचा Digital Map तयार करू शकते.

Map हळूहळू तयार होतो!

Picture Credit: Pinterest

Map तयार झाल्यानंतर Robotला Cleaning Route अधिक व्यवस्थित आखता येतो. काही Modelsमध्ये Roomनुसार Cleaning किंवा Specific Area निवडण्याची सुविधाही असते.

पुढच्या Cleaningमध्ये फायदा

Picture Credit: Pinterest

Robot Vacuum फक्त फिरत नसतो; Sensors + Navigation Technology + Software यांच्या मदतीने तो घराची रचना समजून घेण्याचा प्रयत्न करतो.

घराचा Digital नकाशा तयार!

Picture Credit: Pinterest