Published Jan 08, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टाईल आयकॉन म्हणून विराटला किक्रेटप्रेमी कायमच पसंती देतात.
फक्त भारतातच नाही तर जगभरात विराटचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत.
विराटचे सोशल मीडियावर मिलियनमध्ये फॉलोअर्स आहेत. विराट त्याच्या चाहत्यांशी सोशल मीडियावरुन कायम संपर्कात असतो.
एकदा एका मुलाखतीत विराटला क्रिकेट व्यतिरिक्त तुला काय आवडतं आणि सोशल मीडिया किती वापरतोस असा प्रश्न विचारला होता.
विराट म्हणाला की, क्रिकेट व्यतिरीक्त मोकळ्या वेळेत गाणी ऐकणं त्याला खूप आवडतं.
विराट पुढे असंही म्हणाला की, तो पूर्ण दिवसभरात 60 ते 90 मिनिटं फोन वापरतो.
विराटच्या मोबाईलचा स्क्रिनटाइम फार कमी असतो. त्याला मोबाईलवर फार वेळ घालवणं आवडत नाही.
क्रिकेट व्यतिरिक्त विराटला व्यायाम आणि विविध पदार्थ खायला खूप आवडतं.
विराट फिटनेसच्या बाबतीत खूप जागृक आहे.
शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम रहावं यासाठी फिटनेस महत्त्वाचा आहे, असं विराटने सांगितलं.