श्रावण महिन्यात अभिषेक करणे शुभ मानले जाते. पण गंगाजल नसल्यास काय करावे. शास्त्रात कोणते उपाय सांगण्यात आले आहे, जाणून घ्या
श्रावण महिना भगवान शिवाचा आवडता महिना आहे. यावेळी भक्तांनी शिव मंदिरात जाऊन जलाभिषेक करावा. गंगाजल नसले तरी पूजा अपूर्ण नसते.
गंगाजल नसल्यास पाणी वापरुन मंत्रांचा जप करुन आपण जलाभिषेक करु शकतो.
एका भांड्यात पाणी घ्या. त्यानंतर उजवा हात खाली आणि डावा हात वर ठेवा. नंतर मंत्रांचा जप करा
"गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती। नर्मदे सिंधु कावेरी जले अस्मिन् सन्निधिं कुरु॥"
ओम नमः शिवाय या मंत्रांचा जप करताना शिवलिंगावर हळूहळू पाणी अर्पण करा. यावेळी पितळ, चांदी किंवा तांब्याचा वापर करता येईल.
सोमवारी जलाभिषेक केल्याने चंद्र दोष, मानसिक शांती, शनि दोष, झोपण्याची समस्या दूर होते. यामुळे मनाला शांती मिळते.
ओम नमः शिवाय या मंत्रांचा जप करुन जलाभिषेक केल्याने मन एकाग्र होते. संकल्प पूर्ण होतात.