डायबेटिस अर्थात मधुमेह असणाऱ्यांसमोर शुगर लेव्हल कंट्रोल करण्याचं मोठं आव्हान असतं. विशेषत: श्रावणात हे अधिक कठीण होतं.
पण काळजी करू नका.डॉ. इरफान शेख यांनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणाऱ्या पदार्थांविषयी माहिती दिली आहे.
पेअर्स, संत्री, ब्लूबेरीज, सफरचंद, चेरीज, पीचेस, प्लम्स, द्राक्षे, एव्हकाडो, पेरू ही फळं मधुमेहींच्या आहारात चालू शकतात.
या फळांचे स्मुदी बनवून किंवा ती दह्यात टाकून खाता येतील. त्यात डायबेटिस सप्लिमेंट वापरल्यास शुगर लेव्हल वाढणार नाही.
रक्तातील साखरेची पातळी संतुलित राखण्यास मदत करणाऱ्या खनिजाची दैनंदिन मात्रा मिळविण्यासाठी आहारात बदाम, अक्रोड, काजू, पिस्ते किंवा शेंगदाण्यांसारख्या नट्सचा समावेश करा.
या सुक्या मेव्यामध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्, प्रथिने आणि फायबर असते, ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी राखण्यास मदत होते.
चिया सीड्सदेखील मधुमेह असणाऱ्यांसाठी फायदेशीर आहेत.
रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करणाऱ्या भाज्यारताळी, बटाटे, बीन्स, गाजर, काकडी, मूळा यांसारख्या भाज्या आणि मसूरसारख्या डाळी श्रावणभर खाण्यास हरकत नाही.
शामोमाईल चहा अनेक प्रकारच्या आजारांना दूर पळविण्यासाठी वापरला जातो.
एका सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार त्याची साखरेची पातळी सांभाळण्यासाठीही मदत होते.
काही मधुमेही संपूर्ण श्रावणभर उपवास करतात. अशावेळी आहाराचे नियोजन केल्यास या काळात आपले आरोग्य सांभाळण्यास मदत होऊ शकेल.