अक्षर चांगलं करण्यासाठी काय करता येईल हे आपण जाणून घेऊयात.

अक्षर चांगलं करण्यासाठी रोज लिखाणाचा सराव करा.

जितका अधिक सराव कराल तितकी स्नायूंची शक्ती तयार होईल, ज्यामुळे अधिक सहज आणि सुंदर लेखन होईल.

लिहिताना व्यवस्थित बसून लिहा. तुम्ही कसे बसता त्यानुसार तुमच्या अक्षराच्या गुणवत्तेत फरक पडू शकतो.

ज्या पेन किंवा पेन्सिलची पकड तुम्हाला आरामदायी वाटतेय अशा पेन किंवा पेन्सिलची निवड करा. त्यामुळे लेखन सुधारेल.

पेन घट्ट पकडू नका.त्यामुळे थकवा येईल आणि हस्तलेखनाच्या गुणवत्तेवर परिणाम होईल.

लेखनाची गती कमी ठेवा.जास्त वेगाने लिहिल्याने अक्षरावर परिणाम होतो.

कर्सिव्ह लेखन करत असाल तर अक्षरे सहजपणे जोडण्याची प्रॅक्टिस करा. अक्षर नीट जोडणं आणि वाचता येण्याजोगी लिहिणं याचा समतोल साधा.

लिखाण करताना कुठे चुकतंय याचा विचार करा आणि चूक सुधारा.