भाज्या फ्रिजशिवायही ताज्या ठेवण्यासाठी सोप्या टिप्स फॉलो केल्या पाहिजेत. 

 हिरव्या भाज्या ताज्या ठेवण्यासाठी त्या पसरवून ठेवा.

 भाज्या टोपल्यामध्ये एकावर एक रचून ठेऊ नका.

काकडी, शिमला मिरची, वांगी अशा भाज्या फ्रेश राहण्यासाठी त्या ओल्या कॉटनच्या  कापडात गुंडाळून ठेवा.

कच्चा बटाटा  खराब होऊ नये म्हणून त्याच्यासोबत लसूण ठेवा.

गाजर ताजे ठेवण्यासाठी त्याचा वरचा भाग कापून एअर टाइट डब्यात ठेवा.

कडिपत्याची पानं तळून एअर टाइट डब्यात ठेवा. आठवडाभर टिकतील.

टोमॅटो ताजे ठेवण्यासाठी ते प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवा आणि त्या पिशवीला छोटी छिद्र पाडा.

आलं कुंडीच्या मातीत दाबून ठेवलं तर जास्त टिकतं.