मन आनंदी ठेवण्यासाठी ‘या’ सुत्रांचा होईल उपयोग

आजकाल प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारच्या चिंता आणि तणावामुळे त्रस्त आहे.

मात्र आज तुम्हाला आम्ही अशा सुत्रांविषयी सांगणार आहोत ज्यामुळे तुमचं मन आनंदी राहील.

नेहमी सकारात्मक विचार करा. नकारात्मकता वाढवणाऱ्या गोष्टींपासून लांब राहा.

 पुरेसे पाणी पिणे आणि संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे. पाणी पिण्याने मेंदूतील रक्त प्रवाह सुधारतो. फळे, भाज्या यांसारखे आरोग्यदायी पदार्थ मेंदूला पोषक तत्त्वे देतात.

रोज व्यायाम आणि ध्यानधारणा करा. यामुळे शरीराला फायदा होतोच पण मनातील चिंतादेखील दूर होतात. उत्साह वाढतो.

सोशल मीडिया, डिजिटल उपकरणं यापासून काही काळ ब्रेक घ्या. मेंदू अधिक काम करेल आणि डोळ्यांना विश्रांती मिळेल.

तुमच्या आजुबाजूच्या गोष्टींचा तुमच्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे सकारात्मक व्यक्तींच्या सहवासात राहा.

निराश वाटायला लागल्यावर दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. हे करताना डोळे बंद करून आनंदी क्षण आठवा मग तुमचा मूड बदलेल.