पोळ्यांसाठी कणीक मळणे हे सर्वात कंटाळवाणे काम असते. 

आज आम्ही तुम्हाला मिक्सरमध्ये कणिक मळण्याची सोपी ट्रिक सांगणार आहोत. 

मिक्सरचे सगळ्यात मोठे भांडे घ्या. 

या भांड्यात जितकं हवं तितकं गव्हाचं पीठ घ्या. 

गव्हाच्या पिठात गरजेनुसार पाणी आणि तेल घाला. 

त्यानंतर मिक्सरचं झाकण लावून हळूहळू फिरवा,एकदम स्पीड जास्त करू नका. 

हळूहळू पिठाचा गोळा तयार होताना मिक्सरमध्ये दिसेल. आवशक्यता वाटल्यास पाणी घाला.

कणीक मळून झाल्यानंतर कणकेचा गोळा बाहेर काढा. तेल लावून घ्या

कणकेचे छोटे-छोटे गोळे तयार करून पोळ्या लाटा.