आनंदी जीवनासाठी रुटीनमध्ये करा थोडेसे बदल
आजकाल प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारच्या चिंता आणि तणावामुळे त्रस्त आहे.
मात्र आपण आपला दृष्टीकोन बदलला आणि रुटीनमध्ये थोडे बदल केले तर जीवनात आनंदी राहू शकतो.
नेहमी सकारात्मक विचार करा.
दिवसाची सुरुवात रोज सकाळी चेहऱ्यावर हास्य आणून आरशात पाहून करा.
रोज व्यायाम करा. व्यायामामुळे शरीराला फायदा होतोच पण मनातील चिंतादेखील दूर होतात.
व्यायामामुळे उत्साह निर्माण होतो.
तुमच्या आजुबाजूच्या गोष्टींचा तुमच्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे सकारात्मक व्यक्तींच्या सहवासात राहा.
निराश वाटायला लागल्यावर दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. हे करताना डोळे बंद करून आनंदी क्षण आठवा.