लसणाच्या पाकळ्या वेगवेगळ्या करून घ्या आणि तासभर पाण्यात भिजवा, त्यानंतर हाताने सहज पाकळ्या वेगळ्या होतात.
लसूण पाकळ्या पाण्यात टाका, आणि मायक्रोवेव्हमध्ये 10 मिनिटे गरम करा.
यामुळे लसणाची साल मऊ होते, आणि पटकन निघते.
फुगेही लसूण सोलण्यासाठी उपयोगी पडतात.
लसणाच्या पाकळ्या वेगवेगळ्या करून फुग्यांमध्ये टाका आणि रगडा, साल लगेच निघेल
फुग्यांप्रमाणेच एखाद्या कापडाच्या पिशवीतही हे होऊ शकते.
आणखी एक सोपा उपाय म्हणजे, लसणाच्या पाकळ्या वेगळ्यावेगळ्या करा.
त्यानंतर लसणाचे डोकं जमिनीवर थोडसं ठेचा, त्यानंतर चोळले तरी लसणाचे साल काढणे सोपे होईल.