घोरण्याच्या समस्येपासून ‘या’ टिप्समुळे होईल सुटका
आजकाल अनेक जणांना घोरण्याची समस्या जाणवत असते.
घोरण्याचा त्रास असलेल्या लोकांची झोप पूर्ण होत नाही.
घोरण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही टिप्स तुम्हाला उपयोगी ठरतील.
एका कुशीवर झोपा. त्यामुळे श्वसन प्रक्रियेत अडथळा येणार नाही.
जाड उशीवर झोपा म्हणजे झोपताना डोकं उंचावलेलं राहतं. परिणामी श्वास बाहेर सोडण्यास वाट मिळते आणि घोरणं कमी होतं.
घोरणं थांबवण्यासाठीच्या स्ट्रिप्सचाही वापर करू शकता.
मद्यपान करणं टाळा.
घोरण्याचा जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.