स्क्रीनटाइम जास्त असलेल्यांनी अशी घ्यावी डोळ्यांची काळजी
वेगवेगळ्या कारणांमुळे आपण सतत स्क्रीनसमोर असतो. त्याचा परिणाम डोळ्यांवर होत असतो.
स्क्रीनटाइम जास्त असल्यास डोळ्यांची काळजी कशी घेऊ शकतो, ते जाणून घेऊयात.
दर 20 मिनिटांनी स्क्रीनपासून ब्रेक घ्या.
स्क्रीनकडे एकटक बघत न राहता मध्ये काही सेकंद डोळ्यांची उघडझाप करा.
थोडासा ब्रेक घ्या आणि डोळे थंड पाण्याने धुवा.
डोळ्यांची ठराविक कालावधीनंतर तपासणी करत राहा.
डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून अँटी- ग्लेअर चष्मा वापरा.
स्क्रीनपासून थोडं अंतर ठेऊन काम करा आणि कॉम्प्युटर किंवा मोबाईलचा ब्राइटनेस कमी ठेवा.
डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आहारात गाजर, बीट अशा पदार्थांचा समावेश करायला हवा ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारेल.