ऑक्टोबर हिटमध्ये घ्या त्वचेची काळजी
ऑक्टोबर हिटमुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे या महिन्यात त्वचेची जास्त काळजी घेण्याची गरज आहे.
ऑक्टोबर हिटमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी काही टिप्स जाणून घ्या.
घरातून बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावा. यामुळे टॅनिंग होणार नाही.
गरज असेल तेव्हाच बाहेर पडा. तसेच कॉटनचे कपडे घाला. टोपी, स्कार्फ यांचा वापर करा.
सनबर्न किंवा टॅनिंग जाणवत असेल तर कोरफड जेलचा वापर करा.
तुमची त्वचा तेलकट असेल तर वाफ घ्या.
चेहरा दिवसातून तीन-चार वेळा थंड पाण्याने धुवा.
तेलकट त्वचा असेल तर तेलकट,मसालेदार आणि तिखट पदार्थ खाणं टाळा.
सौंदर्य प्रसाधनांचा वापर कमी करा.
रात्रीचं जागरण करणं टाळा. यामुळे चेहऱ्यावर पुरळ, मुरुमं उठतात.