नुकताच पावसाळा ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूत दमट वातावरणामुळे बऱ्याच गोष्टींना बुरशी लागत असते
पावसाळ्यात आरोग्याबरोबरच घरातल्या गोष्टींचीही विशेष काळजी घेतली पाहिजे
पावसाळ्यात धुतलेले कपडे लवकर सुकत नाहीत अशावेळी बऱ्याचदा कपडे ओले राहतात
ओलाव्यामुळे कपड्यांना बुरशी लागते, हु बुरशी घालवण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करू शकता
पावसाळ्यात मसाले आणि डाळी यांची विशेष काळजी घ्यायला हवी
मसाले खराब होऊ नये यासाठी त्यांना हलके गरम करून काचेच्या बरणीत ठेवावे
पावसाळ्यात आद्रतेमुळे लाकडी वस्तू खराब होतात
लाकडी वस्तू खराब होऊ नये यासाठी ओल्या कपड्याचा वापर टाळा आणि कोरड्या कापडाचा वापर करा
पावसाळ्यात दमट हवामानामुळे लेदरच्या वस्तूंना बुरशी लागते
यासाठी लेदरच्या वस्तू हवेशीर जागेत ठेवाव्यात आणि पाण्यापासून त्यांना दूर ठेवावेत