कांद्याची पात आरोग्यासाठी फायदेशीर,‘या’ पद्धतीने करा वापर

कांद्याच्या पातीमध्ये अनेक पोषक तत्व आढळतात.

 कांद्याच्या पातीच्या नियमित सेवनाने हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.

 पातीच्या कांद्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते आणि रक्तवाहिन्या निरोगी राहतात.

कांद्याची पात तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकता. हा कांदा पातळ कापून सॅलडमध्ये घाला. त्यात टोमॅटो, काकडी आणि लिंबाचा रस घाला.

कांद्याच्या पातीची भाजी खाणे किंवा पातींचा रस पिणेही फायदेशीर आहे.

 ब्रेडवर कांद्याची पात, टोमॅटो आणि इतर भाज्या घालून सँडविच बनवू शकता.

कांद्याची पात बारीक चिरून चटणीमध्ये वापरु शकता.

कांद्याची पात आणि इतर भाज्यांचे सूप बनवून ते पिऊ शकता.