Hyundai ची i20 फेसलिफ्ट हॅचबॅक भारतात लाँच, फिचर्स आहेत लय भारी

Hyundai Motor India कंपनीने आपल्या प्रीमियम हॅचबॅक i20 चे फेसलिफ्ट मॉडेल भारतात लाँच केलं आहे.

गाडीच्या स्टायलिंगमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. शिवाय फीचर अपग्रेड्सही आहेत. 

फेसलिफ्टेड मॉडेलमध्ये पॅरामेट्रिक डिझाइनसह नवीन एलईडी हेडलॅम्प आणि फ्रंट ग्रिलमध्ये एम्बेड केलेले डीआरएल देण्यात आले आहेत.

या गाडीच्या फ्रंटला नवीन 2D Hyundai लोगोसह एक नवीन रूप देण्यात आलं आहे.

 इंटिरिअरला ड्युएल टोन ग्रे आणि ब्लॅक इंटीरियरसह सेमी लेदरेट सीट डिझाईन आणि लेदरेट अप्लाईड डोअर आर्मरेस्ट आहे. तसेच नवीन डी-कट स्टिअरिंग व्हील आणि BOSE प्रीमियम 7 स्पीकर सिस्टम आणि सी-टाइप यूएसबी चार्जिंगचीही सोय आहे.

या कारमध्ये 6 एअरबॅग्ज,ESC,हिल असिस्ट कंट्रोल,व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट,3-पॉइंट सीट यांचा समावेश आहे. सीट्ससाठी बेल्ट रिमाइंडरसह इतर वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.

 ही कार नवीन Amazon Grey सह 6 मोनोटोन आणि 2 ड्युएल-टोन कलरमध्ये सादर करण्यात आली आहे.

i20 मध्ये फक्त 1.2 पेट्रोल इंजिन आहे. या 1.2 पेट्रोल इंजिनमध्ये Idle Stop and Go (ISG) फीचर देण्यात आले आहे.

 मॅन्युअल ट्रान्समिशन मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 6.99 लाख रूपयांपासून सुरू होते. टॉप-एंड 1.2L iVT ट्रान्समिशन मॉडेलची किंमत रु. 11 लाखांपर्यंत आहे.