इम्रान खान यांच्या अटकेनंतर देशभरात त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. ठिकठिकाणी जाळपोळ व तोडफोडीच्या घटना सुरू झाल्या.
पाकिस्तानातील पेशावरमध्ये आंदोलनकर्त्यांनी रेडिओ स्टेशनच्या इमारतीलाच आग लावली.
इम्रान खान यांच्या समर्थकांनी रस्त्यावर जाळपोळ सुरू केली आहे.
इस्लामाबाद, कराची, फैसलाबाद, मुल्तान, पेशावर या ठिकाणी समर्थाकांनी जाळपोळ केलेली आ
हे.
यासोबतच आंदोलकांनी रावळपिंडी येथील लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला.
पोलिसांच्या गाड्या पेटवल्या जात आहेत. या हिंसक आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
जगातील अनेक देशांमध्ये पीटीआय समर्थकही निषेध करत आहेत.
अटक बेकायदेशीर घोषित करण्यासंबंधीची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली
.
पाकिस्तानात 144 कलम लागू करण्यात आलं आहे.