डेंग्यूची लागण झाल्यावर आहाराची घ्या विशेष काळजी

Lifestyle

09 September 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

हर्बल टी

डेंग्यूमध्ये आलेल्या अशक्तपणातून लवकर बाहेर पडण्यासाठी चहा किंवा कॉफी न घेता हर्बल टीचं सेवन करा. तुम्हाला वाटल्यास त्यामध्ये तुम्ही अद्रक किवा वेलची टाकून वापर करू शकता. हर्बल टीमुळे तुमच्या शरीराला आराम मिळेल.

Picture Credit: Pinterest

डेंग्यूची लागण झाल्यावर अधिक प्रमाणात पाणी प्यावे. पाणी प्यायला त्रास होईल पण पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच ओआरएस पावडर देखील पाण्यातून प्यायलास त्याचा फायदा होईल. यामुळे डिहायड्रेशन होत नाही.

पाणी

Picture Credit: Pinterest

डेंग्यू पेशंटने अधिक प्रमाणात तरल पदार्थांचे सेवन करावे ज्यामुळे शरीरात असलेला व्हायरस आणि विषारी तत्व बाहेर पडण्यास मदत होईल. डेंग्यू झालेल्या लोकांकरिता लिंबू हे वरदान मानलं जातं. या दिवसांत लिंबू पाण्याचे सेवन अधिक करता. व्हायरल लघवी वाटे बाहेर जाण्यास अधिक मदत करतो.

लिंबू पाणी 

Picture Credit: Pinterest

नारळ पाणी

डेंग्यूमधील व्हायरलमध्ये सर्वात अगोदर तुमच्या शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. हे मेंटेन करण्यासाठी नारळ पाणी घ्यावे.

Picture Credit: Pinterest

दलिया (लापशी)  

Picture Credit: Pinterest

डेंग्यूच्या रूग्णाने जेवणात दलियाचा वापर करावा. यामुळे शरीरात एकप्रकारची एनर्जी राहते. यामध्ये तुम्ही दलियाचा उपमा, दलियाचा पुलाव किंवा गोड दलिया म्हणजे लापशी करून खावू शकता.

प्रोटीनयुक्त पदार्थांचा वापर  

Picture Credit: Pinterest

डेंग्यू झाल्यावर रूग्णाने प्रोटीनने भरलेले पदार्थ अधिक खावेत. अशामध्ये त्यांनी अंड्याचा समावेश आपल्या जेवणात करावा. प्रोटीनयुक्त आहारात दूध, डेअरीच्या पदार्थाचे सेवन करावे, अशात डेंग्यू लवकर निघून जातो.

काय खावू नये

Picture Credit: Pinterest

डेंग्यू झाल्यावर तेलकट, मसालेदार पदार्थ आणि अधिक आंबट असे पदार्थ टाळावेत. या दिवसांत तोंडाला चव नसते अशावेळी तुम्ही लिंबाचे लोणचे खावू शकता.