Appleचं पहिलं स्टोअर मुंबईतल्या BKCमध्ये आहे.
स्टोअर कसं असेल याचे फोटो कंपनीने शेअर केले आहेत.
ॲपलचं दुसरं रिटेल स्टोअर दिल्लीत 20 एप्रिलला सुरू होणार आहे.
Apple कंपनीचे स्टोअर सुरू झाल्यानंतर ग्राहकांना चांगली सुविधा, प्रॉडक्ट पोर्टफोलिया आणि अन्य ऑफर्स मिळतील. प्रॉडक्टसचा इन हँड फीलही तुम्ही घेऊ शकता.
Apple चे i phone, MAC आणि दुसरे प्रॉडक्टस ऑफलाइन मिळत होते, मात्र, आता हे अधिकृत स्टोअरमध्ये मिळणार आहे.
कंपनी ग्राहकांना Apple Saket आणि Apple BKC चे वॉलपेपर तसेच म्युझिक ऑफर करत आहे. जे युझर्स डाऊनलोड करू शकतात
.
Appleचं हे स्टोअर सोमवारी बंद असेल. मंगळवार ते रविवार सकाळी 11 ते रात्री 10 पर्यंत स्टोअर सुरू असेल
.
कंपनीने आपले पहिले ऑनलाइन स्टोर २०२० मध्ये सुरू केले होते. त्याचवर्षी कंपनी ऑफलाइन स्टोअरही सुरू करणार होते. मात्र याला विलंब झाला.