२२ जून रोजी भारताच्या संघाचा बांग्लादेशविरुद्ध सामना पार पडला.
या सामन्यांमध्ये भारताच्या संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्याने महत्वाची भूमिका बजावली.
हार्दिक पंड्याने २७ चेंडूंमध्ये ५० धावा करत अर्धशतक झळकावले.
गोलंदाजांमध्ये कुलदीप यादवने ४ षटके टाकली यामध्ये त्याने १९ धावा देत ३ विकेट्स मिळवले.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ४ षटके टाकून फक्त १३ धावा दिल्या आणि २ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
भारताचा सलामी फलंदाज विराट कोहलीने सामन्यात २८ चेंडूंमध्ये ३७ धावा करून महत्वाची खेळी खेळली.
अर्शदीप सिंह विश्वचषकामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने बांग्लादेशविरुद्ध सामन्यात २ बळी घेतले.
रिषभ पंतने बांग्लादेश विरुद्ध महत्वाची भूमिका बजावली, त्याने २४ चेंडूंमध्ये ३६ धावा केल्या आहेत.
टीम इंडियाचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे, त्यामुळे भारताचा कर्णधार रोहित शर्माचा नवा प्लॅन काय असेल याकडे चाहत्यांच्या नजरा आहेत.