देशातल्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.
हवामान विभागानेही अनेक राज्यांना अलर्ट जारी केलेला आहे.
देशातील 8 राज्यांमध्ये पावसामुळे यावेळी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
या राज्यांतील अनेक भाग पाण्यात बुडाले आहेत.
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, आसाम आणि केरळ इत्यादींचा या राज्यांमध्ये समावेश आहे.
मुसळधार पावसानंतर इथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे 133 रस्ते बंद आहेत.
उत्तराखंडमध्ये खराब हवामानामुळे 154 रस्ते बंद करण्यात आले आहेत.
आसाममधील 6 जिल्ह्यांतील 121 गावांमधील सुमारे 22 हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे.