एशिया कपमध्ये भारत आणि नेपाळ आमनेसामने येणार आहेत.
दोन्ही देशांमध्ये ही मॅच 4 सप्टेंबरला पार पडणार आहे.
ही मॅच श्रीलंकेतील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे.
भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता मॅच सुरू होणार आहे.
तर दुपारी 2.30 वाजता टॉस होणार आहे.
एशिया कपमधील ही पाचवी मॅच असणार आहे.
रोहित शर्मा भारताचा कॅप्टन तर रोहित पौडेल नेपाळचा कॅप्टन असेल
नेपाळ पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना हरला आहे.
भारताची पहिली मॅच पावसामुळे रद्द झालेली आहे, त्यामुळे या मॅचकडे साऱ्यांचंच लक्ष आहे.