आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ १४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.
भारतीय संघ या हाय व्होल्टेज सामन्यासाठी अहमदाबादला पोहोचला आहे.
शुभमन गिलही भारतीय संघासोबत अहमदाबादला गेला आहे. त्याला डेंग्यूची लागण झाली होती.
अहमदाबादला पोहोचल्यानंतर शुभमन गिलने जवळपास एक तास नेटमध्ये सराव केला.
गुरुवारी भारतीय संघाची नेट प्रॅक्टिस नसतानाही गिल सरावासाठी उतरला.
मात्र, तरीही गिलला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळणे अवघड आहे.
डेंग्यूमुळे गिल ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध खेळू शकला नाही.