पावसामुळे भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज मॅच रद्द झाली. 

आता भारत-पाकिस्तान यांच्यातील मॅच राखीव दिवशी होणार आहे. 

24.1 षटकांनंतर पाऊस सुरू झाला त्यामुळे राखीव दिवशी मॅच घेण्याचा निर्णय झाला. 

भारताची फलंदाची जिथे खेळ थांबला होता तिथूनच सुरू होईल. 147 रन्स, 2 विकेट

राखीव दिवशीही पावसाचा मॅचवर परिणाम झाल्यास काय होणार?

राखीव दिवशीही खेळाचा निकाल लागला नाही तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्याच्या निकालासाठी किमान 20-20 ओव्हर्सचा खेळ होणं गरजेचं आहे. 

त्यामुळे मॅचचा निर्णय देण्यासाठी पाकिस्तानला 20 ओव्हर्स खेळणं गरजेचं आहे.