भारतातल्या ‘या’ ठिकाणांवर भारतीयांना बंदी पण परदेशी पर्यटकांना एन्ट्री
आज आपण भारतातल्या अशा ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत जिथे भारतीयांना प्रवेश बंदी आहे पण परदेशी पर्यटकांना तिथे येऊ दिलं जातं.
चेन्नईतलं लॉलीपॉप हॉस्टेल फक्त परदेशी पर्यटकांसाठी आहे.
दुसरं ठिकाणं हिमाचल प्रदेशातलं आहे. इथल्या कसोल गावातील फ्री कसोल कॅफेमध्ये भारतीयांना प्रवेश दिला जात नाही.
फ्री कसोल कॅफेमध्ये फक्त परदेशी पर्यटक जाऊ शकतात.
गोव्यातल्या ओन्ली फॉरेनर्स बीचवरदेखील फक्त परदेशातले लोक जाऊ शकतात.
बंगळुरूतील यूनो-इन हॉटेलमध्ये फक्त जपानी नागरिकांना प्रवेश दिला जातो.
हिमाचल प्रदेशातल्या नोरबुलिंका कॅफेमध्ये भारतीय येऊ शकत नाहीत. फक्त परदेशी पाहुण्यांना इथे प्रवेश दिला जातो.
अंदमान आणि निकोबार बेटांवरील नॉर्थ सेंटिनल आयलँडवर आदिवासी लोक राहतात. इथे बेटावरचे लोक सोडून इतर कुणालाही प्रवेश दिला जात नाही.