भारताचा संघाने ४७ धावांनी विजय मिळवून सुपर-८ मध्ये पहिला विजय मिळवला आहे.

भारत अफगाणिस्तान सामन्यात अर्शदीप सिंहने ४ षटकांमध्ये ३६ धावा देत ३ विकेट्स मिळवल्या.

जसप्रीत बुमराहने सर्वात कमी धावा देऊन ३ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

भारताचा स्टार फलंदाज जसप्रीत बुमराहने २८ चेंडूंमध्ये ५३ धावा करत मोलाची कामगिरी केली.

विश्वचषकामधील कुलदीप यादवने पहिला सामना खेळून अफगाणिस्तानच्या २ फलंदाजांना ड्रेसिंग रूममध्ये पाठवले.

विराट कोहलीने अजूनपर्यंत त्याच्या बॅटने धावा केल्या नाहीत, त्याने अफगाणिस्तानविरुद्ध २४ चेंडूंमध्ये २४ धावा केल्या.

अक्षर पटेलने शेवटच्या षटकात ६ चेंडूंमध्ये १२ धावा करून महत्वाची भूमिका बजावली. त्याचबरोबर त्याने त्याच्या गोलंदाजीने सुद्धा चाहत्यांची मनं जिंकली.

हार्दिक पंड्याने कालच्या सामन्यात सूर्यकुमार यादवची साथ दिली. त्याने २४ चेंडूंमध्ये ३२ धावा केल्या.

भारताचा पुढील सामना बांग्लादेशविरुद्ध २२ जूनला होणार आहे.